Thursday, 20 April 2023

सकाळच्या टॉप-3 ब्रेकींग न्यूज.. २१ एप्रिल

 👩🏻‍💼 'या' महिलांसाठी वसतिगृहे बांधण्याची राज्यपालांची सूचना!


नोकरी, स्वयंरोजगार व उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा या दृष्टीने मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधण्यात यावीत, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. या कार्यात कॉर्पोरेट्स व उद्योग संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले असून सर्व शहरांमध्ये, गर्दीच्या भागांमध्ये आणि विशेषतः रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहे बांधावीत, सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प बांधावे तसेच प्रत्येक व्यावसायिक व उद्योग समूहांमध्ये युवकांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याच्या संधी निर्माण कराव्यात, अशाही सूचना राज्यपालांनी उद्योग जगताला नुकत्याच केल्या आहेत.


👧🏻 महाराष्ट्रातील शाळांना आजपासून सुट्टी


महाराष्ट्रातील सर्व शाळांना आजपासून (21 एप्रिल) उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेत राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुट्टी देण्यात आली आहे. उन्हामुळे मुलांना शाळेत जाण्यास अडचणी येत असल्याने पालकांनी यासंबंधीचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत निर्णय घेत सुट्टीची घोषणा केली. दरम्यान शाळा 15 जूनपासून विदर्भ सोडून उर्वरित महाराष्ट्र आणि 30 जून रोजी विदर्भातील शाळा सुरू होतील असेही केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.


😎 शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-2022 चा निकाल घोषित


शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-2022 चा निकाल घोषित करण्यात आला आहे. ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. ‘क’ वर्ग गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. ‘ड’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका व अहमदनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

No comments:

Post a Comment

What is Java Permutation and Combination Program?

Here's A Java Program That Calculates Permutations And Combinations: ```Java Import Java.Util.Scanner; Public Class Permutationcombinati...